ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांना छातीत दुखू लागल्याने मंगळवारी दुपारी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभय बंग यांच्यावर याआधी बायपास सर्जरी देखील झाली आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार बंग यांना मंगळवार सकाळपासून जाणवू लागली. दुपारच्या सुमारास गडचिरोतील एका नियोजित कार्यक्रमास ते गेले असताना छातीतील दुखणे वाढले आणि त्यांना तातडीने नागपूरस्थित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभय बंग यांच्यावर सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात(आयसीयू) उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jan 2015 रोजी प्रकाशित
डॉ. अभय बंग रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांना छातीत दुखू लागल्याने मंगळवारी दुपारी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published on: 27-01-2015 at 07:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr abhay bang hospitalised