अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ या गावात ग्रामपंचायत निवडणूक होत असून या निवडणूक काळामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी या एकाच गावातील गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या दहा जणांवर एका महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये उमेश पाटील, महेश पाटील, शरद पाटील, श्रीशैल पाटील ऊर्फ व्हसुरे, सिद्धाराम शरणप्पा पाटील ऊर्फ व्हसुरे, रेवप्पा व्हसुरे, गंगाधर पाटील, अशोक गडदे, मल्लिनाथ पाटील, गड्डेप्पा व्हसुरे अशा दहा जणांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तहसीलदारांकडे दहा समाजकंटकांविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. तो त्यांनी मंजूर केल्याचे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवाडे यांनी सांगितले.
यापूर्वी अक्कलकोटच्या एका भाजप नगरसेवकाच्या गुन्हेगारी कारवाया पाहता त्याच्याविरुद्धही हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2015 रोजी प्रकाशित
अक्कलकोटमध्ये एकाच गावातील दहा जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई
दहा समाजकंटकांविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव
Written by अपर्णा देगावकर

First published on: 28-10-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driven action people village akkalkot solapur