धुळ्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी बिलाडी रोडवरील पुलावर घडली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहून नेणाऱ्या या डंपरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिलाडी रोडवरील कुंडाणे फाट्याजवळील पांझरा नदी पुलावर आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास डंपरने पेट घटला. इंजिनमधील वायरिंगच्या शॉर्ट सर्कीटमुळे डंपरच्या पुढील बाजूस अचानक आग लागली. यावेळी डंपरमधील चालक आणि क्लिनरने समय सूचकता दाखवत गाडी थांबवून बाहेर उडी घेत स्वतःचे प्राण वाचवले. मात्र भर रस्त्यात हा डंपर पेटल्याने काही वेळासाठी या ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumper caught fire in dhule
First published on: 24-03-2017 at 16:56 IST