शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत. त्यांचा आवाज ऐकवून शिवसैनिकांना गंडेदोरे बांधण्याची वेळ का आली, याचा शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे, असे टीकास्त्र सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले. मुंबईतील सभेत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधनाचा गंडा बांधून घेतला. हाच धागा पकडून पवार यांनी शिवसेनेचे आमदार व खासदार पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात नाशिक विभागीय बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर टिप्पणी केली. राज्यात सेना-भाजपने टोल संस्कृती आणली आहे. टोल विषयी नवीन धोरण आणण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधीच मांडली आहे. नवीन धोरण आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
गंडे बांधण्याची वेळ का आली -अजित पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत. त्यांचा आवाज ऐकवून शिवसैनिकांना गंडेदोरे बांधण्याची वेळ का आली, याचा शिवसेनेने विचार करण्याची गरज आहे

First published on: 25-01-2014 at 02:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dy cm ajit pawar slams shiv sena in speech