मिरज-पंढरपूर रस्त्यावरील खरशिंग गावात एका पाच एकराच्या खडकाळ निकृष्ट जमिनीवर नंदनवन फुलवण्यात आलं आहे. दयानंद बापट यांच्या पुढाकारामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली आहे. दयानंद बापट यांनी या ओसाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. २९ जुलै २०१६ रोजी त्यांनी प्रारंभही केला. झाडे लावा झाडे जगवा ही निव्वळ घोषणा न देता त्यांनी प्रत्यक्षात या माळरानावर झाडे लावून त्यांचे संरक्षण केले आणि वाढवलीसुद्दा. सध्या येथे वड, पिंपळ, चिंच, गोरखचिंच, कदंब अशा विविध प्रकारच्या वृक्षांसह १५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. तसंच आंबा, अंजिर , डाळिंब, चिकू, सिताफळ अशा फळांच्या बागा आहेत. तीन वर्ष घेतलेल्या परिश्रमामुळे मोकळ्या रानमाळावर हिरवाई नटली आहे. आज या ओसाड माळावर उभी राहिलेली झाडं आणि विविध तऱ्हेच्या फुलांच्या बागा सगळ्यांनाच आकर्षित करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान यंदा पाच हजार तुळशीची रोप लावण्यात आली आहेत. या ठिकाणी आता पशुपक्षांचे आगमन देखील झाले आहे. पूर्वी एकही चिमणी याठिकाणी दिसत नव्हती. मात्र आता तीनशे, साडेतीनशेपेक्षा जास्त चिमण्यांची चिवचिव याठिकाणी ऐकू येत. यांच्यासाठी खास दाणा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्यासाठी छोटे कुंडही तयार करण्यात आले आहेत. बाहेरील जनावरांना पाणी पिता यावे यासाठी गेटवर हौद बांधण्यात आले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेऊन बोअरिंगची सोय करण्यात आली आहे. तसंच ६० लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. येथे उभारण्यात आलेल्या गोठ्यात गिरच्या गाई आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dyanand bapat create greeneryon barren land kharshing village miraj pandharpur sgy
First published on: 29-07-2019 at 15:02 IST