scorecardresearch

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ‘ईडी’कडून चौकशी!

एकूण प्रकरण ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येत असल्याने सहकार क्षेत्रात खळबळ

महाविकास आघाडीमधील नेते मंडळींच्या पाठीमागे सक्तवसुली संचालनालय (ईडी) चा ससेमिरा कायम असल्याचे दिसत आहे. आताराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडी कडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासोबतच अन्य प्रकरणांमध्ये ईडीकडून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर साखर कारखान्याचे हे संपूर्ण प्रकरण ५०० कोटींच्या घरात जात असल्याची माहिती आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आता पर्यंत या पिता-पुत्राची तीनवेळा चौकशी झाली असल्याचं देखील समोर येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed interrogates son along with ncp mla babanrao shinde msr

ताज्या बातम्या