कोकणाच्या शहरी भागाप्रमाणेच गेल्या काही वर्षांत ग्रामीण क्षेत्रातही शिक्षणाचा चांगला प्रसार होत असून त्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्य़ात शिक्षण क्षेत्रात चांगली स्पर्धा दिसत आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्था पुढाकार घेत आहेत. इंग्रजी माध्यमातूनही ग्रामीण भागात शिक्षण दिले जाऊ लागले आहे. अशा स्थितीत हे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे.
माखजन पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रंगावली प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर फणसे यांनी केले, तर पर्यवेक्षक राजेंद्र केळकर यांनी आभार मानले. प्रा. किशोर पाटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मंडळाचे मानद अध्यक्ष अॅड. पी.आर. नामजोशी, अध्यक्ष डॉ. ज.रा. बापट, मुख्याध्यापक सदाशिव बापट, सह्य़ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार लक्षणीय -जिल्हाधिकारी जाधव
कोकणाच्या शहरी भागाप्रमाणेच गेल्या काही वर्षांत ग्रामीण क्षेत्रातही शिक्षणाचा चांगला प्रसार होत असून त्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले.
First published on: 23-04-2013 at 04:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education spread remarkable in rural area district officer jadhav