जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहतो की नाही, याविषयी चर्चेला उधाण आले होते. मात्र तुमच्यासारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे उद्गार माजीमंत्री आ. एकनाथ खडसे यांनी काढले.
येथील जळगाव जिल्हा सहकारी बँक, वरिष्ठ नोकरांची पतपेढी व मिनिअल स्टाफ क्रेडीट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. खडसे यांनी यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त करत राजकीय विषयांसह पत्रकारांशी बोलणे टाळले. महसूल खात्यासह सर्व मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल आठवडाभरानंतर त्यांचे शनिवारी सकाळी जळगावमध्ये आगमन झाले. दादर-अमृतसर एक्सप्रेसने आलेल्या खडसे यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यानंतर ते आपल्या मुक्ताई निवासस्थानी आले.
आ. भोळे यांनी खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर चौकशी करतांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. चौकशीत सत्य समोर येईलच, मात्र खडसे व पक्षाला बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी खडसे यांनी भाषण करणे टाळले. मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांची वैयक्तिकरित्या चौकशी केली. पक्ष आपल्यासोबत असून कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse
First published on: 12-06-2016 at 01:40 IST