राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसं सूचवलं आहे. जंयत पाटील नुकतेच जळगाव दौऱ्यावर येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावात आयोजित केलेल्या एका सभेत बोलताना जयंत पाटील एकनाथ खडसे यांना म्हणाले, रावेर लोकसभेचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा. दरम्यान, एकनाथ खडसे यांनीदेखील यास अनुकूलता दर्शवली आहे. विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले, मी लोकसभा लढवण्यास फार उत्सूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन.

एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात केलेल्या भाषणात मला म्हणाले रावेर लोकसभा क्षेत्राचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा अशी आमची इच्छा आहे. खरंतर ही लोकसभा आजवर काँग्रेस लढवत आली आहे. १९८९ साली हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण १० निवडणुका झाल्या. या १० पैकी नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. केवळ एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली. काँग्रेसने केवळ १३ महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता.

वाई, कराड उत्तरेत कामाला लागा – उपमुख्यमंत्री अजित पवार; साताऱ्यात पदाधिकाऱ्यांना सूचना
ashish shelar on vidhan parishad election result
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाचेही आमदार फुटले? आशिष शेलारांचा मोठा दावा; म्हणाले…
sharad pawar
सत्तेतील लोकांची भूमिका शपथेशी विसंगत यामुळे परिवर्तन अटळ- शरद पवार
Sharad Pawar Sangli Tour
“राजकारण करायचं असतं, पण कायम…”, शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
Anil Patil on Congress
“काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी…”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचा मोठा दावा
Nana Patole
“लपवाछपवीची मॅच नाही, ७० दिवसानंतर खरी…”, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
Eknath Shinde on Jayant Patil
“जयंतराव तुम्ही नकली वाघांबरोबर आहात, असली वाघांबरोबर या”, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला
Pankaja Munde
विधान परिषदेनंतर पंकजा मुंडेंना आता मंत्रिपदही मिळणार? स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

हे ही वाचा >> ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

एकनाथ खडसे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले काँग्रेसचा रावेरमध्ये नऊ वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी आता बदल करावा आणि आम्हाला ही जागा द्यावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत अजून याबाबत निर्णय व्हायचा आहे. निर्णय झाला तर तो काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षाच्या सूचनेचा नक्कीच विचार करेन.