scorecardresearch

Premium

ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Eknath Shinde Rishi Sunak Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. तसेच ऋषी सुनक मला याविषयी सगळं सांगणार आहे, असंही नमूद केलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) जळगावमधील पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचं नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी. काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल. मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे.”

What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
mahesh gaikwad slams bjp mla ganpat gaikwad
आमदार गणपत गायकवाड भाजपचे असते तर एवढे निर्घृण वागले नसते, शहरप्रमुख महेश गायकवाड यांची टीका
Accusation between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Abhishek Ghosalkar murder case
गोळय़ा मॉरिसने झाडल्या की अन्य कुणी? उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
What Devendra Fadnavis Said?
उद्धव ठाकरेंच्या ‘मनोरुग्ण’ टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या डोक्यावर…”

“त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय”

“यांचं सरकार गेल्यावर त्यांना विश्वास नाही की, सरकार गेलंय की, राहिलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत.”

“मी त्यावर बोलणार नव्हतो, पण मुद्दाम सांगतो”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता. काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे. मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो.”

“ते दरवर्षी लंडनला येतात, मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात”

“ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हे बोलताना शिंदेंनी उपस्थितांना यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे असं विचारलं. त्यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असं म्हटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी हे मत व्यक्त केलं.

हेही वाचा : “ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला, पण काय बोलले? अन्…”, उद्धव ठाकरेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

“मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल,” असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Serious allegations by eknath shinde about uddhav thackeray london property mention rishi sunak pbs

First published on: 13-09-2023 at 12:22 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×