मागील वर्षातील जून महिन्यात शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले. याच बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. आमदारांनी बंड केलेल्या काळात सलग तीन दिवस मी एक मिनिटही झोपलो नव्हतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. ‘समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या ‘सकाळ सन्मान’ या सोहळ्यात एकनाथ शिंदे बोलत होते.

हेही वाचा > राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंची रुग्णशय्येवरून शेरोशायरी; म्हणाले, “मौत कल आती है, आज…”

Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक
actor govinda congress
‘राजकारणात येऊन मोठी चूक केली’, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविंदानं असं का म्हटलं होतं?
Rajan Vikhares challenge to Shinde group in Thane search for a candidate in Kalyan continues
ठाण्यात राजन विचारे यांचे शिंदे गटासमोर आ‌व्हान, कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरूच

तीन दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो

एकनाथ शिंदे कायमच लोकांमध्ये दिसतात. त्यामुळे शिंदे झोप कधी आणि किती तास घेतात, असे त्यांना विचारण्यात आले. याच प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचे तसेच त्या दिवसांचे स्मरण केले. “जेव्हा आमदारांनी बंडखोरी केली, तेव्हा मी तीन दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो. तेव्हा वेळच तशी होती. मात्र आता कामाचा भार आहे. लोकांनाही भेटावे लागते. प्रशासकीय कामे असतात. शासकीय बैठका असतात. जबाबदारी आहे तर पार पाडण्याचे काम करतो. या सर्व कामांमुळे झोप कमी होते मात्र चालून जाते,” असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा > ‘लोक परिवर्तनासाठी उत्सुक,’ म्हणणाऱ्या शरद पवारांना गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तत्वज्ञान सांगण्यापेक्षा…”

…तर म्हणतील मुख्यमंत्री झाल्यावर बदललो

“माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझे टॉनिक आहे. लोकांची कामे, लोकांची गर्दी हीच माझी उर्जा आहे. सहा महिन्यांपूर्वी मी मुख्यमंत्री झालो. मी सहा महिन्यांपूर्वी शाखेत जायचो, लोकांना भेटायचो. आता मुख्यमंत्री झालो आहे. आता मी हे बंद केलं तर मुख्यमंत्री झाल्यावर मी बदललो, असे लोक म्हणतील,” असे मिश्कील भाष्य शिंदे यांनी केले.