'तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही,' शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले "तेव्हा वेळच..." | eknath shinde said dont sleep for one minute in three days of shiv sena mla revolt | Loksatta

‘तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही,’ शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना एकनाथ शिंदेंचे विधान; म्हणाले “तेव्हा…”

मागील वर्षातील जून महिन्यात शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली.

‘तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही,’ शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना एकनाथ शिंदेंचे विधान; म्हणाले “तेव्हा…”

मागील वर्षातील जून महिन्यात शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले. याच बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. आमदारांनी बंड केलेल्या काळात सलग तीन दिवस मी एक मिनिटही झोपलो नव्हतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. ‘समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या ‘सकाळ सन्मान’ या सोहळ्यात एकनाथ शिंदे बोलत होते.

हेही वाचा > राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंची रुग्णशय्येवरून शेरोशायरी; म्हणाले, “मौत कल आती है, आज…”

तीन दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो

एकनाथ शिंदे कायमच लोकांमध्ये दिसतात. त्यामुळे शिंदे झोप कधी आणि किती तास घेतात, असे त्यांना विचारण्यात आले. याच प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचे तसेच त्या दिवसांचे स्मरण केले. “जेव्हा आमदारांनी बंडखोरी केली, तेव्हा मी तीन दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो. तेव्हा वेळच तशी होती. मात्र आता कामाचा भार आहे. लोकांनाही भेटावे लागते. प्रशासकीय कामे असतात. शासकीय बैठका असतात. जबाबदारी आहे तर पार पाडण्याचे काम करतो. या सर्व कामांमुळे झोप कमी होते मात्र चालून जाते,” असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

हेही वाचा > ‘लोक परिवर्तनासाठी उत्सुक,’ म्हणणाऱ्या शरद पवारांना गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तत्वज्ञान सांगण्यापेक्षा…”

…तर म्हणतील मुख्यमंत्री झाल्यावर बदललो

“माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझे टॉनिक आहे. लोकांची कामे, लोकांची गर्दी हीच माझी उर्जा आहे. सहा महिन्यांपूर्वी मी मुख्यमंत्री झालो. मी सहा महिन्यांपूर्वी शाखेत जायचो, लोकांना भेटायचो. आता मुख्यमंत्री झालो आहे. आता मी हे बंद केलं तर मुख्यमंत्री झाल्यावर मी बदललो, असे लोक म्हणतील,” असे मिश्कील भाष्य शिंदे यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:28 IST
Next Story
काँग्रेसचाच उमेदवार म्हणतोय, ‘काँग्रेस पक्ष बोगस’; दोन उमेदवारांमधील संवादाची ध्वनीफित प्रसारित