scorecardresearch

Premium

“तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Eknath Shinde Tanaji Sawant
एकनाथ शिंदे – तानाजी सावंत

ठाणे जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज (२२ एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. ठाण्यात मोठं सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य केलं. तसेच आरोग्य विभागाने गेल्या काही काळात केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. यासह मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकाही केली.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, ते तानाजी सावंतांना महाराष्ट्राच्या कॅबिनेटध्ये शिक्षणमंत्री करणार होते. परंतु वादांच्या भितीने ते तसं करू शकले नाहीत. शिंदे म्हणाले की, “तानाजीराव मघाशी म्हणत होते की, त्यांनी साखरेत डॉक्टरी केली आहे. साखरेत डॉक्टरी केल्यामुळे तुमच्यामुळे खूप लोकांची शुगर (साखर) वाढली आहे.”

CM Eknath Shinde came to Satara and wished Udayanraje on his birthday
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
bjp leader shivraj singh chouhan kolhapur visit marathi news
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
Deputy Chief Minister Ajit Pawar directly called the Secretary of Medical Education Department
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावला थेट वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना फोन, ‘आपले काम…’
Kiran Mane Mahatma Phule marathi sahitya sammelan
“बेट्याहो, महात्मा फुलेंची इज्जत…”, ‘तो’ फोटो शेअर करत किरण मानेंचा संताप; मुख्यमंत्री शिंदेना म्हणाले, “कारस्थान करुन…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तानाजीराव, तुमच्या शैक्षणिक संस्थादेखील खूप आहेत. सुरुवातीला मी असा विचार केला होता की, तुम्हाला शिक्षमंत्री करायचं. पण मग ज्याच्या शिक्षणसंस्था जास्त त्याला शिक्षणमंत्री केलं तर कॉन्ट्रोव्हर्सी (वाद) होते. म्हणून तसं करता आलं नाही. सामान्य माणसाला सेवा देणारा हा आरोग्य विभाग आहे. तुम्ही या विभागात उत्तम काम करत आहात.

हे ही वाचा >> “लोक आम्हाला गौतमी पाटीलचे व्हिडीओ दाखवून…” तमाशा कलावंतांनी मांडली खंत, म्हणाले, “तिचे चाळे…”

एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण उभारत असलेल्या या नव्या रुग्णालयामुळे हजारो, लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय आपलं सरकार आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम करत आहे. आपण रुग्णवाहिका वाटप करतोय, राज्यात हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. परंतु आपल्या या कामांमुळे अनेकांना पोटदुखी होत आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत उपचार केले जातील. जनतेला सेवा पुरवणं हेच आपलं काम आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde says could not appoint tanaji sawant as education minister cause controversy asc

First published on: 22-04-2023 at 15:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×