कराडच्या (जि. सातारा) पाल येथील मरतड देवस्थानचा गजराज ‘राजेंद्र ऊर्फ रामप्रसाद’ला दीर्घकाळ साखळदंडांमध्ये जखडून ठेवण्यात आले होते. आजारपणामुळे त्रस्त असलेल्या या गजराजाच्या वेदनांना अंत नव्हता. त्याची व्यथा पीपल फॉर अ‍ॅनिमल या संघटनेसाठी काम पाहणाऱ्या खासदार पूनम महाजन यांच्यापर्यंत पोचली. मग चक्रे फिरली आणि बऱ्याच धावपळीनंतर गजराजाची सुटका करण्यात आली. आता त्याची रवानगी सोमवारी मथुरा येथे वैद्यकीय उपचारांसाठी करण्यात आली असून तेथेच त्याला वेदनांमधून मुक्ती मिळणार आहे.
गजराजाला प्रदीर्घ औषधोपचाराची गरज होती व हा खर्च देवस्थानला परवडणारा नव्हता. ही माहिती केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अ‍ॅनिमल संघटनेपर्यंत पोचली. पूनम महाजन यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशीही संपर्क साधला. प्राण्याच्या संगोपन व देखभालीसाठी कायदा व नियम असून त्यांचा भंग होत होता. पण कार्तिक सत्यनारायण या प्राणिमित्राच्या मदतीने महाजन यांनी मथुरा येथील हत्तींवरील उपचार केंद्राशी संपर्क साधला. राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांच्या कानावर या बाबी घालून गजराजाला तेथे हालविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या.
सोमवारी त्याला मथुरेला पाठविण्यात आले आहे. तेथे पोचल्यावर लगेच उपचार सुरू होतील आणि त्याला पुढील काळात तेथेच ठेवले जाईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.

दु:खांची परिसीमा
या ३२ वर्षीय गजराजाची कहाणी अतिशय दु:खप्रद आहे. म्हैसूर येथून १९९२ मध्ये आणल्या गेलेला हा गजराज गेली अनेक वष्रे गावातील यात्रा व महोत्सवांमध्ये सहभागी होत होता. पण गेल्या वर्षी यात्रेत तो बिथरला होता. या गजराजाला माहुतांकडून त्रास दिला जात होता व दीर्घकाळ बरेच अत्याचार करण्यात येत होते. त्याचे संगोपन योग्य प्रकारे केले जात नव्हते. साखळदंडाने जखडून त्याला अनेकदा मारहाणही केली जात असे, अशी माहिती पूनम महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!