एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांनी पद्मश्री नामदेव ढसाळांच्या कवितेचं वाचन केलं होतं. या कवितेचा उल्लेख पोलिसांनी दिलेल्या अहवालात या कवितेचा उल्लेख आहे. या कवितेवरून ढवळेंवर खटला भरण्यात आला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांनी नामदेव ढसाळांच्या गोलपिठा संग्रहातील त्या कवितेच वाचन करत, त्यात आक्षेपार्ह काय होत? असा सवाल व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले,”सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळांची एक कविता वाचली. ज्या गोलपिठा काव्यसंग्रहाला राज्य सरकारनं पुरस्कार दिला. केंद्र सरकारनं पद्मश्री दिला. त्यांची कविता वाचली म्हणून पोलिसांनी ढवळेंवर खटला भरला. या काव्यात एक संतापजनक ओळ आहे. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. कुसुमाग्रजांच्या कवितांमध्येही हा संताप आहे. साहित्य आणि काव्य आक्रमक असलं म्हणून त्यांना देशद्रोही म्हणणार का?” असा शरद पवार यांनी उपस्थित केला.

Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

पुढे बोलताना पवार म्हणाले,

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखेमाजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिँदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यँत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिँदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
आग लावत चला …

आणखी वाचा – संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळं वातावरण तयार केलं – शरद पवार

अशी ही नामदेव ढसाळांची कविता आहे. या कवितेचा शेवटच्या ओळी आग लावत चला अशा आहेत. त्याचा अर्थ लगेच आग लावणार असा होत नाही. ही कविता असलेल्या गोलपिठाला राज्य सरकारनं पुरस्कार दिलेला आहे. साहित्य आणि काव्य आक्रमक असलं म्हणून मी त्यांना देशद्रोही म्हणणार नाही. पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केला,” असं पवार म्हणाले.