मनोर- विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्यावर आज(गुरुवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालघर – अमळनेर एसटी बस एका टेम्पो धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

पालघर वरून अमळनेरकडे जाणारी एसटी बस पालघर येथून सहा वाजता रवाना झाली होती. मनोर- विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्यावरून प्रवासी घेतल्यानंतर पुढे जाऊन बसचा ब्रेक दाबल्यानंतर निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातात बस चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

अपघातग्रस्त एसटी बसमध्ये विक्रमगडहून जव्हारच्या दिशेने जाणारे ३० प्रवासी होते. अपघातात जखमींमध्ये दयानंद (वय -५४), कैमूद्दीन शेख (वय – ३१), धिरेंद्र यादव (वय-३२), राधेश्याम तिवारी (वय-३८), रवींद्र यादव (वय-४०) आणि एसटी बसचालक तवाब खान (वय-३२) यांचा समावेश आहे.