scorecardresearch

जन्मदाताच बनला काळ, पोटच्या दोन मुलांना फेकले विहिरीत

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलांना दारुच्या नशेत विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलांना दारुच्या नशेत विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर हिंगणा रोडवर वागधरा शिवार येथे ही दुर्देवी घटना घडली. संतोष लक्ष्मण मेश्राम (३१) असे आरोपीचे नाव आहे.

घरगुती कारणावरुन भांडण झाल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या संतोष मेश्रामने दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिले. दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून हर्षकुमार मेश्राम (६) आणि प्रिन्सकुमार मेश्राम (३) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father killed two sons in nagpur

ताज्या बातम्या