सोलापूर : सोलापुरात भाजपअंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत तयार केलेले सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे आव्हान उढे ठाकले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि तेवढ्याच प्रतिष्ठेची होणार असल्याचे दिसून येते.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलमध्ये सोसायटी सर्वसाधारण गटातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, याच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सहकार नेते राज शेखर शिवदारे, इंदुमती अलगोंड- पाटील आदींची उमेदवारी रिंगणात आहे. तर दुसरीकडे दोन्ही देशमुखांच्या परिवर्तन पॅनेलमध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांच्यासह भाजपचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. चन्नवीर हविनाळे, आप्पासाहेब पाटील-वडगबाळकर आदींचा समावेश आहे.

एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले पॅनेल पुढीलप्रमाणे-

सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेल : सोसायटी सर्वसाधारण गट-दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोडे (लिंबू चिंचोली, ता. दक्षिण सोलापूर), उमेश पाटील (भंडारकवठे, ता. द. सोलापूर), उदयकुमार पाटील (संजवाड, ता. द. सोलापूर), नागण्णा बनसोडे (नांदणी, ता. द. सोलापूर), सोसायटी ओबीसी गट-अविनाश मार्तंडे (मार्डी, ता. उत्तर सोलापूर),

ग्रामपंचायत सर्वसाधारण गट-गणेश वानकर (देगाव, ता. उत्तर सोलापूर), संगमेश बगले (लवंगी, ता. द. सोलापूर), महिला सर्वसाधारण गट-इंदुमती अलगोंड-पाटील (वडकबाळ, ता. द. सोलापूर), अनिता केदार विभूते (बोरामणी, ता. द. सोलापूर), भटक्या जाती-जमाती गट-सुभाष पाटोळे (होटगी स्टेशन, ता. द. सोलापूर), आर्थिक दुर्बल घटक-सुनील कळके (मुस्ती, ता. द. सोलापूर), अनुसूचित जाती-जमाती गट-रवींद्र रोकडे (बोरामणी).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवर्तन पॅनेल : सोसायटी सर्वसाधारण गट-डॉ. चन्नवीर हविनाळे (बरूर, ता. द. सोलापूर), रमेश आसबे (अकोले मंद्रूप), आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर (वडकबाळ), संग्राम पाटील (कौठाळी, ता. उत्तर सोलापूर), धनेश बाराचरे (बोरामणी), ग्रामपंचायत सर्वसाधारण गट-मनीष सुभाष देशमुख (सोलापूर), रामप्पा चिवडशेट्टी (होटगी, ता. द. सोलापूर), महिला गट-नीलाबाई पुजारी (वडगबाळ), पुष्पा गुरव (हणमगाव, ता. द. सोलापूर), ओबीसी गट-सुभाष तेली ( होनमुर्गी ता. द. सोलापूर), भटक्या विमुक्त-संदीप टेळे (औराद, ता. द. सोलापूर), आर्थिक दुर्बल घटक-यतीन शहा (भंडारकवठे).