सातारा शहरात लक्ष्मी टेकडी परिसरात जोरदार मारामारी

साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी परिसरात दारू दुकानावर  विक्रीतून जोरदार मारामारी झाली.

परीसरात तणाव,शहर पोलिस ठाण्यात नागरिकांची गर्दी

वाई : साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी परिसरात दारू दुकानावर  विक्रीतून जोरदार मारामारी झाली. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने घरात घुसून एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केल्याने नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मोठ्या जमावाने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत  तेथे बैठक ठोकत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

     रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास  बेकायदेशीर दारु विक्री करणार्‍या एका टोळक्याने धुडगूस घातला. घरात घुसून या टोळक्याने एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात नागरिक भयभीत झाले. यातूनच टोळक्याने परिसरातील काही वाहनांची तोडफोड करत ती वाहने पाडली.

हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता. तोपर्यंत सदरबझारमध्ये नागरिक जमा झाले.दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी या संतप्त घटनेविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सर्वाधिक समावेेश होता. रात्री   शेकडोंचा जमाव शहर पोलिस ठाण्यासमोर आल्यानंतर पोलिसांची गडबड उडाली. अचानक जमाव आल्याने पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तोपर्यंत रस्त्यावर बघ्यांची गर्दी  वाढल्याने पोलिसांनी तक्रार घेवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत  झाला.सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असून आदेशाचा भंग करून जमाव गोळा करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस संबंधितांच्या शोधात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fighting lakshmi hill satara city ysh

ताज्या बातम्या