मराठी चित्रपट सृष्टीचा वैभवशाली इतिहास असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे जतन करण्यात यावे, या मागणीसाठी कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज भडका उडाला. या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या चित्रकर्मींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसा इशारा चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. जयप्रभा स्टुडिओची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर येथे जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आजचा २५१ वा आंदोलनाचा दिवस होता.

हेही वाचा- Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग

जयप्रभा स्टुडिओ समोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गेल्या सोमवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व चित्रपट कलाप्रेमी यांच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देऊन जयप्रभा स्टुडिओ संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, माजी संचालक सतीश बिडकर आदींनी दिला होता.

हेही वाचा- तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातच ; गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारच्या हालचाली

या आंदोलनाची स्थानिक आमदार, शासकीय पातळीवर कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे चित्रपट कलाप्रेमी खदखद जाणवत होती. त्यातून आज आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्या चित्रकर्मींनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. आत्मदहन करण्याचा इशारा देत त्यांनी घोषणाबाजी केली. इतर आंदोलन चित्रकर्मींनी धाव घेऊन त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले.