सांगली : इस्लामपूरमध्ये खाद्यतेलाचा व्यवसाय करुन राज्य सरकारचा ४८कोटींचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) भरणा केला नाही म्हणून तीन खाद्यतेल व्यापाऱ्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील पेठ येथे महालक्ष्मी ट्रेडिंग, महेश व्हेज ऑईल आणि मे. महेशकुमार ट्रेडिंग या कंपन्याच्या नावे एप्रिल २०११ ते मार्च २०१६ या काळात खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय करण्यात आला.
या कंपनीच्या नावे व्हॅट कर नोंदणीही करण्यात आली होती. मात्र शासनाचा करभरणा केला नाही. यामुळे व्याजासह ४८ कोटींचा कर भरणा केला नसल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनी संचालक सुनिता देशमाने, संतोष देशमाने व मनोजकुमार जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.