कोल्हापुरातील रमणमळा परिसरातील दोन गटांमध्ये असलेल्या पारंपरिक वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी झालेल्या गोळीबारामध्ये एकजणाचा मृत्यू झाला.  रमणमळा परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये शुक्रवारी दुपारी बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान पुढे गोळीबारामध्ये झाले. एका गटातील व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दुसऱया गटातील एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला. डोक्यात गोळी लागल्यामुळे एकजण मृत्युमुखी पडला. जखमी झालेल्या दुसऱया व्यक्तीला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.