सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्र वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून प्रश्न उपस्थित केला आहे. अर्धवट कपडे घालून सार्वजानिक ठिकाणी वावरल्यास मारहाण करणार, अशी धमकीही चित्रा वाघ यांनी दिली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या वादात उडी घेतली.

दोन समुदायात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महिला आयोगाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत महिला आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच महाराष्ट्र भाकरीच्या तुकड्याचा प्रश्न विचारतोय, आणि तुम्ही कपड्याच्या तुकड्यावर बोलत आहात, अशी टीका चाकणकरांनी केली. चाकणकरांच्या या विधानावर चित्रा वाघ यांनी खोचक टोला लगावला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा- विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कंपनीचा दणका, केली मोठी कारवाई

रुपाली चाकणकर यांना उद्देशून चित्रा वाघ म्हणाल्या, “कपड्याच्या तुकड्यावरून चित्रा वाघ बोलत आहे, असं तेच म्हणतात. बरं झालं त्यांनी मान्य केलं की, ‘ते कपडे नाहीयेत, तुकडे आहेत’, ज्यावर चित्रा वाघ बोलत आहे. अश्लील किंवा कसले कपडे परिधान करायचे? किंवा कोणते नाही घालायचे… हे ज्याने-त्याने ठरवावे. पण अरे आधी कपडे तरी घाला… आधी कपडे घाला मग ठरवा, काय घालायचे आणि काय घालायचे नाहीत,” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

हेही वाचा- “जी नंगानाच करत फिरतेय, तिला…”, महिला आयोगाच्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रा वाघ पुढे असंही म्हणाल्या की, काहीही झालं तरी मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतेय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही. यावर आम्ही आजही ठाम आहोत, उद्याही असणार आहोत. महिला आता केवळ चूल आणि मूल यासाठी मर्यादित राहिली नाही. फक्त भाकरीच्या तुकड्यापुरतं तिचं अस्तित्व नाहीये. पण आपल्या समाजात तुकड्यांमध्ये कुणी सार्वजनिक स्वैराचार करत असेल किंवा तसं वर्तन करत असेल तर हा जबाबदार महिलेचा अपमान नाही का?” असा सवाल वाघ यांनी विचारला.