शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचं पत्र भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल आणि गृह सचिवांना लिहिलं आहे. मागील दोन वर्षांपूर्वीं तुझ्यावर जो हल्ला झाला तो लक्षात ठेव अशी धमकी देणारा फोन आपल्याला आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्ता आल्यानंतर शिवसेनेने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. सत्तेत आल्यावर शिवसेनेने धमकी दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. राज्याच्या गृहसचिवांना आणि राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तसंच आपण असल्या धमक्यांना भीक घालत नाही, माझं जे काम आहे ते मी सुरुच ठेवणार असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या धमकीबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे का ? असे विचारले असता आपण मुख्यमंत्र्यांना अशी माहिती दिली नाही. मात्र भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं.