भाजपाचा उल्लेख आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा वॉशिंग मशीन असा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीतेही उपस्थित होते. शिशिर धारकर यांच्याविषयी बोलत असताना उद्धव ठाकरेंना भाजपाला टोला लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिशिर धारकर यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, धारकर यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्याकडे वॉशिंग मशीनमध्ये जाण्याचाही सोपा पर्याय होता. मात्र धारकर लढवय्यांच्या शिवसेनेत आले आहेत. संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही म्हणतात, पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. तुम्हाला मूर्ख बनवलं जातं आहे. मात्र हे जास्त काळ चालणार नाही, मी आज जास्त बोलत नाही बाकी गोष्टी पेणच्या सभेत बोलेन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मातोश्रीवरील प्रवेशादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. शिशीर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. मात्र, आव आणणारे काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे ही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्याचं शिवसेनेत स्वागत आहे. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काहीजण बघीतले आव मोठा आणतात. डोळे वटारले की पळून गेले. पण, तुम्ही पळपुटे नाहीत, याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे गटात प्रवेश केलेले शिशिर धारकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप

पेण र्अबन बँक घोटाळ्या गेली दहा वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले शिशिर धारकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी ‘मातोश्री’ वर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साडेसातशे कोटी रुपयांच्या पेण अर्बन बँक घोटाळय़ात शिशिर धारकर हे प्रमुख आरोपी आहेत. बेनामी कर्ज बँक बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारणात पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला होता. पेण नगरपालिका निवडणुकीत पेण विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. धारकर यांनी आता हातावर शिवबंधन बांधले आहे.