नाशिकमधील कामटवाडा परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून एका घराबाहेर लावण्यात आलेल्या तीन दुचाकी गुरुवारी रात्री जाळण्यात आल्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडा परिसरामध्ये रमेश दळवी यांचे घर आहे. त्यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या तीन दुचाकी गाड्या गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आल्या. आगीचे लोट थेट दळवी यांच्या घरापर्यंत पोहोचेल्यावर त्यांना घडलेल्या घटनेची माहिती झाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या साह्याने आग विझवण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी चौघा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2016 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये पूर्ववैमनस्यातून दुचाकी जळीतकांड, चौघांना अटक
रमेश दळवी यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळल्या
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-01-2016 at 11:41 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four two wheelars burnt in nashik