बुलढाणा जिल्ह्यात मित्रांनीच एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. १० रुपये देण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आली. आरोपींनी हे पैसे दारुसाठी मागितले होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून आरोपींनी डोक्यावर काठीने वार करुन हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय पीडित भागवत सीतारामा फासे आपले मित्र विनोद वानखेडे आणि दिलीप यांच्यासोबत मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. यावेळी विनोद आणि दिलीप यांनी भागवत यांच्याकडे बारमध्ये गेले असता १० रुपये मागितले. भागवत यांनी पैसे देण्यास नकार दिला असताना ते संतापले. भागवत बारमधून बाहेर जात असताना आरोपांनी त्यांच्या डोक्यावर मागून काठीने वार केला.

हल्ल्यानंतर भागवत तिथेच खाली पडले आणि मृत्यू झाला. पोलीस पोहोचले तेव्हा भागवत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेच्या एक तासानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दारुच्या दुकानात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचा फोन आम्हाला आला होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर एका तासात आम्ही आरोपींना अटक केली,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे.