सांगली : शिक्षक अध्यापनाचे कार्य कसे करतात याचा अनुभव मंगळवारी मिरजेतील कन्या महाविद्यालयात शिकणार्याक मुलींनी घेतला. यावेळी विद्यार्थिनींनी शिपायापासून ते प्राचार्य पदापर्यंतची जबाबदारी पार पाडत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थिनीनी पहिल्या सत्रातील अध्यापनाचे कार्य आपण तयारी करून केले. वर्गात जाउन मुलींना शिकवण्यापासून घंटा देण्यापर्यंतचे काम मुलींनी मोठ्या हौसेने केले. दुसर्याव सत्रात शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. पी.एस. पांडव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. पांडव यांनी आजच्या काळात चांगले विद्यार्थी निर्माण करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थिनी राधिका चव्हाण हिने केले. तर पाहुण्यांचा परिचय अंकिता कांबळे यांनी करून दिला. यावेळी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ.सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सागर पाटील, प्रा. सुवर्णा यमगर, विनायक वनमोरे, प्रा.वर्षा जोग आदींनी केले. बारावीत शिकणारी पूजा कराडे हिने आभार मानले तर सूत्र संचालन सुहानी हिरगुडे हिने केले.