शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला. हा निर्णय नितेश राणेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मात्र जो जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय त्या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान नितेश राणेंना देण्यात आलेला जामीन हा मागच्या दारानं दिलेला असल्याचं भूमिका सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.

नक्की वाचा >> नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयीन सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांना न्यायालयामध्ये नक्की काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यासंदर्भात दिलेली दहा दिवसांची मुदत ही न्यायालयासमोर शरण येईपर्यंतची होती असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केल्याचं घरत म्हणाले.

मागच्या दाराने दिलेला जामीन
“न्यायालयाने जामीन देतोय म्हणून बाहेर जाऊ दे किंवा परवानगी देतोय म्हणून बाहेर जाऊ देतो असं सांगायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयासमोर अर्ज केला की शरणागतीवर लेखी हुकूम करावा लागेल. १० दिवसांचा दिलासा असल्याने तोवर ताब्यात घेता येणार नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही तो १० दिवसांचा वेळ शरण येण्यासाठी होता, त्यामुळे शरण आल्यानंतर ती मुदत संपली असं सांगितलं. पण न्यायालयाने म्हणणं मान्य केलं नाही. शरणागतीवर कोणताही निर्णय दिला नाही तर त्याला तो मागच्या दाराने दिलेला जामीन होईल असंही म्हणणं मांडलं,” असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

नक्की वाचा >> नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

न्यायालयाबाहेर गोंधळ…
न्यायालयाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.

नितेश राणेंची गाडी अडवली
निकालानंतरची कागदोपत्री पूर्तता, नोटीस आणि इतर पूर्तता करताना न्यायालयाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवून ठेवण्यात आली होती, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाबाहेरच्या गोंधळानंतर नितेश राणे पुन्हा एकदा न्यायालयाच्या इमारतीमध्ये गेले. मात्र न्यायालयाने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूच्या वकिलांना पुन्हा बोलवलं होतं असं सरकारी वकील म्हणाले. “आता ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं. त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं,” असं प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

जामीन का नाकारला?
“जामीन अर्ज या कोर्टासमोर राखण्यायोग्य नाही सांगत फेटाळला आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्यानुसार प्रथम शरण आलं पाहिजे आणि नंतर जामीन अर्ज केला पाहिजे. पण शरण न येताच जामीन अर्ज केल्याने हा अर्ज कोर्टासमोर राखण्यायोग्य नाही असं कोर्टाने सांगितलं,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.