सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.  सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा नोटीशींना आम्ही भीक घालत नाही असं मनसेने म्हटलं आहे. तर राज ठाकरेंना असा प्रकारे ईडीमार्फत नोटीस बजावली जाणं ही सरकारची दडपशाही असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government love us so they sent ed notice says sharmila thackeray scj
First published on: 19-08-2019 at 14:36 IST