सध्याची सरकारी धोरणे ही केवळ शहरी भाग आणि उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेचा कोणताही विचार करण्यात आला नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या मराठवाड्यातील तीन दिवसीय दुष्काळ दौऱ्याला आजपासून औरंगाबाद येथून सुरूवात झाली. यावेळी औरंगाबादमधील काही भागांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. अन्यथा वेळ आल्यास आम्ही सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू अशा इशाराही यावेळी पवारांनी दिला. मात्र, हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2015 रोजी प्रकाशित
सरकारची धोरणे शहरी भागांना आणि उद्योगपतींना अनुकूल- शरद पवार
सध्याची सरकारी धोरणे ही केवळ शहरी भाग आणि उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहेत.

First published on: 30-05-2015 at 05:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government policies are framed for metro regions and business says sharad pawar