सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न होता. या निवडणुकीतून मी जर माघार घेण्याची चूक केली असती तर सांगली लोकसभा निवडणुक बिनविरोध झाली असती अशी टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जत तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या जाहीर सभेत केली.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अपयशाचा अंदाज आल्याने मोदींची जीभ घसरतेय – पृथ्वीराज चव्हाण

sangli lok sabha marathi news, bjp sanjaykaka patil sangli marathi news, vishal patil sangli marathi news
सांगलीतील चित्र बदलले, भाजप – अपक्षात चुरस
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Sangli Lok Sabha, Chandrahar Patil,
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

हेही वाचा – “..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, दरिबडची येथे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती सूजय शिंदे, आप्पाराय बिराजदार, बसवराज बिराजदार, सरपंच बिराप्पा शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांनी पाण्यासाठी कर्नाटकमध्ये सहभागी होण्याचा इशारा देताच राज्य शासनाने सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र निष्क्रिय खासदार या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा निष्क्रिय खासदारांना घरी बसविण्याची हीच योग्य वेळ आहे. मालमत्ता, कारखाना विकत घेऊन स्वत:ची इस्टेट दुपटीने, चौपटीने वाढवत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. प्रतिक पाटील केंद्रीय मंत्री असताना म्हैसाळ योजना एआयबीपीमध्ये हस्तांतरित झाली. त्यानंतर हजारो कोटींचा निधी मंजूर झाला. दिल्ली, मुंबईतून सांगलीचा खासदार ठरत असेल तर सांगलीचा स्वाभीमान जागा करण्याची वेळ आली आहे. सांगलीची अस्मिता जपण्यासाठी जनतेने मला पुढे केले आहे.