शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताप आहे की मनस्ताप असं म्हणत टीका केली. यावरून अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. “अजित पवार हे तोंडावर बोलणारे व्यक्ती आहेत, ते नाटक करणारी व्यक्ती नाही,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. तसेच ते म्हणजे अजित पवार आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत, असंही नमूद केलं. ते रविवारी (१२ नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “अजित पवार हे तोंडावर बोलणारे व्यक्ती आहेत, ते नाटक करणारी व्यक्ती नाही. त्यांनी आयुष्यात कधीही नाटक केलं नाही. त्यांना खरोखर डेंग्यू झाला होता. आम्ही स्वतः दोन तीन वेळा त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठका घेतल्या. त्यावेळी ते आजारी होते. त्यांच्या प्लेटलेट्स (पेशी) कमी होत होत्या. आता पेशी वाढत आहेत, पण अशक्तपणा आहे.”

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

“अजित पवार आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत”

“अजित पवारांचा आवाज जवळून ऐकला, तर तो आवाज बसलेला होता हे लक्षात येईल. मला वाटतं आता ते व्यवस्थित झालेले असतील. अजित पवारांचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे अजित पवार आत एक आणि बाहेर एक असं करणारे नाहीत. सरळ तोंडावर सांगणारे निर्भिड व्यक्ती आहेत,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.

“प्रतिज्ञापत्र खरी आहेत की खोटी हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला”

खोट्या प्रतिज्ञापत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “झोमॅटो असो, स्विगी असो, आमच्या पक्षात त्या प्रत्येक कामगारांचा विभाग आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र दाखल केले असतील. प्रतिज्ञापत्र खरी आहेत की खोटी हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला पक्षाला नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल.”

हेही वाचा : “अजित पवारांना नेमका कसला ताप आहे की…”, उद्धव ठाकरेंचा टोला

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे”

“अशाचप्रकारच्या तक्रारी मागीलवेळी शिवसेना प्रकरणातही झाल्या होत्या. त्यावेळी कोल्हापुरात चौकशी पथक आलं होतं. ते पथक याबाबतची चौकशी करून गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे. पक्षचिन्ह घड्याळ आमचंच राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून पक्ष कुणाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल,” असंही हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं.