भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील माहिती

नागपूर : भारतातील जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाले असले, तरीही महाराष्ट्रातील जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतीय वनसर्वेक्षण अहवालात नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत नोंदवल्या गेलेल्या आगीच्या घटनांपैकी सर्वाधिक घटना महाराष्ट्रातील आहेत.

२०१८ मध्ये भारतातील जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण सर्वोच्च होते. या कालावधीत ३७ हजार ५९ घटनांची नोंद आहे. २०१९ मध्ये २९ हजार ५४७ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र, २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत आगीच्या घटनांमध्ये ४९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातही २०१८ या वर्षांत सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद आहे. २०१६ मध्ये २४ हजार ८१७, २०१७ मध्ये ३५ हजार ८८८ तर २०१८ मध्ये  ३७ हजार ०५९ इतक्या घटनांची नोंद करण्यात आली. सॅटेलाईट सिस्टम मॉडरेट रिजॉल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रो-रेडिओमिटर(एमओडीआयएस) आणि व्हिजिबल इंफ्रारेड इमेजिंग रेडिओमिटर सुईट(एसएनपीसी-व्हीआयआयआरएस) या दोन यंत्रणांच्या माध्यमातून जंगलाला लागणाऱ्या आगीची पाहणी केली जाते. यादरम्यान एमओडीआयएसने २९ हजार ५४७ आगीच्या धोक्याची सूचना दिली. तर एसएनपीसी-व्हीआयआयआरएसने दोन लाख १० हजार २८६ सूचना दिल्या. देशातील २५ हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक वनक्षेत्र क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच सर्वाधिक संवेदनशील आहे. याठिकाणी प्रत्येक ऋतुमध्ये आगी लागतात. याव्यतिरिक्त ३९ हजार ५०० चौरस किलोमीटर जंगल अतिसंवेदनशील आहे. तर ६३.९० टक्के वनक्षेत्र कमी संवेदनशील आहे.

देशभरात आगीच्या घटना घडत असताना चंदीगड आणि लक्षद्वीपमध्ये एकाही  घटनेची नोंद नाही. जम्मू-काश्मीरमध्ये केवळ ७२३ घटनांची नोंद आहे. हवामान बदलामुळे कोरड वाढत आहे. माती आणि वातावरणात आद्र्रता कमी झाल्यामुळेही जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक बँकेने देखील २०३० पर्यंत जंगलाला लागणाऱ्या आगीमुळे जंगल आणि झाडे वाढण्याच्या क्षमतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

आगीची संवेदनशीलता

* सर्वाधिक संवेदनशील – २५,६१७ चौरस किलोमीटर

* अतिसंवेदनशील – ३९,५०० चौरस किलोमीटर

* संवेदनशील – ७५,९५२ चौरस किलोमीटर

* मध्यम संवेदनशील – ९६, ४२२ चौरस किलोमीटर

* कमी संवेदनशील ४,२०,६२५ चौरस किलोमीटर

राज्य         आगीच्या घटना

महाराष्ट       २९,४५५

छत्तीसगड      २७,३५८

मध्यप्रदेश      २४,८३१

ओडिशा       २१,२८२

आंधप्रदेश       १७,४९४

उत्तराखंड       १६,५०८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक       ९,३०६

मिजोरम       ९,१४२

मणिपूर       ९,१३६