सातारा येथील अदालतवाडा नजीक असणाऱ्या ओढय़ात सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची मुघलकालीन सोने आणि चांदीची नाणी सापडली. याची बाजारभावानुसार किंमत दहा लाख पंधरा हजार रुपये इतकी आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दाभाडे यांना काही इसमांकडून सातारा शहरातील काही जणांना सोन्या-चांदीची नाणी मिळाल्याचे समजले. दाभाडे तसेच प्रतिबंधक कारवाई पथकाचे सुहास पवार, राकेश देवकर, विशाल मोरे यांनी आरोपी प्रकाश भिसे व लहू मोरे यांना ताब्यात घेतले आहे. हा तपास सुरू असताना त्यांच्याकडून एक तांब्याचे जुने फुटके भांडे जप्त केले. त्यात चांदीची ८५ व सोन्याची २ नाणी सापडली. तसेच एक सोन्याची लगडही हस्तगत करण्यात आल्याचे सांगितले. लगडीची किंमत अंदाजे ७५ हजार इतकी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2014 रोजी प्रकाशित
साता-यात सापडली मुघलकालीन नाणी!
सातारा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दाभाडे यांना खब-याकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी टाकलेल्या छाप्यामध्ये शुक्रवारी इतिहासकालीन ऐवज हस्तगत करण्यात आला.
First published on: 08-08-2014 at 04:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical coins found in satara