scorecardresearch

Premium

बीआरएसमध्ये गेलेल्यांची घरवापसी- आ. जयंत पाटील

तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने घरवापसी सुरू झाली आहे.

Homecoming of those who went to BRS says MLA Jayant Patil
शनिवारी सांगलीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.(फोटो-लोकसत्ता टीम)

सांगली : तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने घरवापसी सुरू झाली आहे. यामुळे कोण बाहेर पडला तरी राष्ट्रवादीवर परिणाम होणार नाही. नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेउन राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील रहा असा सा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. शनिवारी सांगलीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, काही महिन्यापुर्वी तेलंगणातील बीआरएस या पक्षाचा मोठा गाजावाजा होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव झाला. त्याठिकाणी काँग्रेसने कष्ट घेतले. त्यांना लोकांनी सत्ता दिली. बीआरएसमध्ये काही आमच्या पक्षातील लोक गेले होते. त्यांचाही आता भ्रमनिरास झाला असून ते पुन्हा आमच्याकडे येत असून त्यांची घरवापसी होत आहे.

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
PM Narendra Modi Yavatmal Rally
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो, देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला
Raj Thackeray on Kulbhushan Jadhav
भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांची सुटका झाल्यानंतर राज ठाकरेंची खास पोस्ट, कुलभूषण जाधव यांच्याबाबत म्हणाले…
Pimpri Chinchwad BJP ncp fighting inauguration credit development
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ‘राष्ट्रवादी’त श्रेयवादाची लढाई, विकासकामांचे उद्घाटन करण्यावरून वाद

आणखी वाचा-आमदार जयंत पाटलांची हुकुमशाही- भाजपा जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील

ग्रामीण भागात आजही शेतकर्‍यांचा नेता म्हणून शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.हा मतदार राष्ट्रवादीपासून दूर करण्यासाठी एका पक्षाने बीआरएसला सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीमध्येच फूट पडल्याने बीआरएसची आता गरजच उरलेली नाही अशी त्या पक्षाची मानसिकता झाली असल्याने काही तरी पदरात पडेल म्हणून गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला.

जिल्ह्यातही काही मंडळी दुसर्‍या गटात गेली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. पक्षाध्यक्ष पवार यांच्या विचारावर विश्‍वास असलेली मंडळी आजही पक्षासोबत आहेत. गेलेल्यांची चिंता न करता नव्या कार्यकर्त्याना सोबत घेउन पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Homecoming of those who went to brs says mla jayant patil mrj

First published on: 10-12-2023 at 19:25 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×