Petrol Hike: पंतप्रधान मोदींचं ९ वर्ष जुनं ट्वीट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांचा टोला

“आता पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. आठवण करून देतो” असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Jitedra Awhad, ayodhya ram mandir, ayodhya land scam, ayodhya news, ayodhya news, ayodhya mandir
आपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह आणि समाजवादी पार्टी नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर आरोप केलेला आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचही शंभरच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे भाजपा विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या ट्विटचा दाखला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जुनं ट्विट पोस्ट करत त्यावर मिश्किल भाषेत टीका केली आहे.

“पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकार अपयशी ठरल्याचं प्राथमिक उदाहरण आहे. यामुळे गुजरातमधील नागरिकांवर भार पडणार आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी असा निर्णय घेणं संसदेच्या सन्मानाला शोभत नाही”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याच ट्वीटचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी रिट्वीट केलं आहे. “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्वीट केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आता पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. आठवण करून देतो” असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जुनं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. हे ट्विट ९ वर्षांपूर्वीचे म्हणजेच २०१२ सालातील आहे. २३ मे २०१२ रोजी त्यांनी हे ट्वीट केलं होतं. मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना त्यांनी पेट्रोल दरवाढीवरुन तत्कालीन केंद्र सरकारला धारेवर धऱलं होतं. पेट्रोल दरवाढीमुळे गुजरातवर मोठा आर्थिक भार पडेल असं मोदींनी म्हटलं होतं. अशाप्रकारे मोदींचं ट्विट व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केलेल्या वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Housing minister jitendra awhad share old tweet of pm modi and slam about petrol price hike rmt

ताज्या बातम्या