Video: धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पती-पत्नी एक्सप्रेस खाली गेले पण…

कल्याण स्थानकामधील हा सर्व घटनाक्रम स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नक्की काय घडलं आणि त्यांना कसं वाचवण्यात आलं पाहूयात…

Train Accident
सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला हा प्रकार

कल्याण स्थानकामध्ये चालत्या एक्स्प्रेस गाडीत चढण्याच्या प्रयत्नात हात सुटल्याने पती-पत्नी गाडी खाली गेल्याची घटना १ नोव्हेंबरच्या सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ एक्सप्रेसमधील गाडी थांबवण्याची चैन खेचल्याने गाडी लगेच थांबली. सुदैवाने हे दोघेही सुखरुप बचावले. गाडी थांबली तेव्हा हे पती पत्नी फलाटाच्या भिंतीचा आसरा घेऊन अंग चोरुन बसल्याचं दिसलं. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली अडकलेल्या या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पाहूयात नक्की कसं हे सारं घडलं…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Husband and wife slip under the express while trying get on the board lucky escape as train stopped well in time scsg

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या