‘आमची कर्जे बघूनच ‘ईडी’ आश्चर्यचकित होईल’

जर महागडय़ा मोटारी वापरल्या नाहीत, तर लोकच आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, असेही ते म्हणाले.

सांगली : आपण भाजपचे खासदार असून ईडी आपल्या मागे लागणार नाही. मात्र, आमची कर्जे बघूनच ईडी आश्चर्यचकित होईल असे विधान खा. संजय पाटील यांनी विटा येथे केले.  विटा येथे एका कार्यक्रमात खासदार पाटील यांच्यासह आमदार अनिल बाबर, वैभव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना खा. पाटील म्हणाले, सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आमच्या मागे लागणे शक्यच नाही. कारण आपण भाजपचे खासदार आहोत. मात्र जर चौकशीची वेळ ईडीवर आलीच तर आमची कर्जे बघून आश्चर्यचकित होऊन ही माणसं आहेत की अन्य कोणी असा सवाल खुद्द ईडीच करेल. आम्ही दिखाऊपणासाठी चाळीस चाळीस लाखांच्या मोटारी वापरतो. जर महागडय़ा मोटारी वापरल्या नाहीत, तर लोकच आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील, असेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am bjp mp ed will not chase me sanjay patil zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या