२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही सुट्टी घेतली नव्हती, अशी माहिती माहिती अधिकारातून पुढे आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ५६ वर्षे सुट्टी घेतली नसल्याचं म्हटलं आहे. बारामतीच्या उंडवडी सुपेमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

शरद पवार गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात काँग्रेसमधून झाली. तर, १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राजकारणात आल्यानंतर त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही, असं शरद पवार म्हणाले. जनतेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, तुम्ही लोकांनी मला आमदार केल, मंत्री केलं. चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला ५६ वर्ष एकही सुट्टी दिली नाही. शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत. हे वागणं काही बरं आहे का?

narendra modi
“खरी शिवसेना अन् राष्ट्रवादी एनडीएबरोबर, तर नकली पक्ष…”; मुंबईतील ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधान मोदींची टीका!
sharad pawar interview
“प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार”; शरद पवार असे का म्हणाले? खरंच हे शक्य आहे का?
Uddhav Thackeray reply to BJP regarding merger of Shiv Sena with Congress Pune print news
‘काँग्रेसमध्ये विलीन होण्यास शिवसेना छोटा पक्ष नाही,’ उद्धव ठाकरे यांचे भाजपला प्रत्युत्तर
Nana Patole, Sharad Pawar
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…”
Sharad Pawar
काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…
Sanjay Raut on Ajit pawar (1)
“मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”
Loksabha Election 2024 CPIM Trinamool Congress West Bengal RSS
“आम्हाला संपवण्यासाठी RSS ने तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली”; डाव्यांचा आरोप
No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?

“इतकी वर्षे लोकांनी साथ दिली, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की शेवटपर्यंत विकासाची कामे करत राहायची. गावात, जिल्ह्यात आणि दिल्लीत तुम्हा लोकांना पुढे ठेवूनच काम करायंच, हे सूत्र ठेवून काम करतोय. तुम्हा सर्वांची साथ आहे याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो”, असं म्हणत शरद पवारांनी जनतेचे आभार मानले.

हेही वाचा >> “सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”, जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी; म्हणाले…

कोणी न स्वीकारलेलं कृषी खातं मी स्वीकारलं

“मी देशाचा कृषिमंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र जो देश कृषिप्रधान देश आहे, त्या देशात अन्न धान्याची आयात करणे मला पटले नाही. माझ्या काळात मी ७१ हजार कोटींची कर्ज माफी केली. व्याज दरात शेतकऱ्यांना सुट दिली. कोणी न स्वीकारलेलं कृषी खातं मी स्वीकारलं. शेतीत अनेक बदल केल्याने आज जगात १८ देशांना आपण धान्य निर्यात करतो. शेतकऱ्यांमुळे ही बाब घडून आली”, असंही शरद पवार म्हणाले.