२०१९ च्या विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ही निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेना आणि भाजपाने मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलं होतं. पण, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत ठरलं नव्हते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीदाची मागणी ठेवल्यावर आम्ही याला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पालघरची जागा आणि जास्तीची मंत्रालयं देण्याचं शिवसेनेला सांगितलं होतं, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात बोलतं होतं.

“मात्र, शिवसेनेने आमच्याबरोबर गद्दारी केली. माझ्या, भाजपाच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला होता. तेव्हापासून आम्ही वाट पाहत होतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या व्यवहारामुळे एकनाथ शिंदेंनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर परत जावा, असे थोडी सांगणार. तेव्हा, एकनाथ शिंदेंना म्हणालो बरं झालं आपण बाहेर पडला. आम्ही तुमच्याबरोबर असू. माझ्याबरोबर जी गद्दारी झाली, त्याचा आम्ही बदला घेतला,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : “मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता, मात्र…”; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

“तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले…”

“महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी सत्तापरिवर्तन करण्यात आलं नाही. तर, मागील अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या, त्यामुळे सत्तापरिवर्तनाचा निर्णय आम्ही घेतला. पण, तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि नंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता,” असे सुद्धा फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री पद दिल्याने शारिरीक वजनासोबत राजकीय वजनही कमी झालं का? फडणवीसांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे मी सरकारमध्ये…”

“वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही राज्यातील महत्त्वाचे नेते आहात. यापूर्वी, तुम्ही मुख्यमंत्री राहिला असून, सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला,” असेही देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.