scorecardresearch

Premium

“माझा बाप मला परत हवाय, आम्हाला आरक्षण…”, जरांगे पाटलांच्या मुलीची सरकारकडे आर्त मागणी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटायला भेटायला येणार आहेत, म्हणजे ते काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेऊनच येतील, असं पल्लवी जरांगे पाटील म्हणाली.

Manoj Jarange and Pallavi Jarange
मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील काय म्हणाली? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. मनोज जरांगे पाटलांचं गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने मागितलेला एक महिन्याचा कालावधी मनोज जरांगेंनी दिला आहे, परंतु, तरीही त्यांनी अद्याप उपोषण सोडलेलं नाही. जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना त्यांच्या मुलांनी बुलाढाण्यात आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची धाकटी कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटायला येणार आहेत, म्हणजे ते काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊनच येतील. मराठा आता पेठून उठला आहे. आता सरकारला दखल घ्यावीच लागणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मराठा आहोत, पेटलेलो आहोत, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही”, असा ठाम निर्धार तिने बोलून दाखवला.

ram mandir congress
उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
CM Mohan Yadav MP government change
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ते मंत्र्यांसाठी विशेष शिकवणी; मोहन यादव MP सरकार कसे चालवतायत?
Vinod Tawde Nitish Kumar (2)
“…म्हणून नितीश कुमार आमच्याबरोबर आले”, बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तांत्रिक बाबी…”

गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण धरलं आहे. त्यामुळे ते उपोषण केव्हा सोडणार असा प्रश्न पल्लवीला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “उपोषण कधी सुटेल हा त्यांचा प्रश्न आहे. उपोषण कधी सोडणार हे पप्पा सांगणार नाहीत. पण, आरक्षण मिळत नाही तोवर ते उपोषण सोडणार नाहीत हे नक्की.”

मनोज जरांगेंनी १६ दिवसांपासून उपोषण केलं आहे. त्यांची प्रकृती खालावत जात आहे. त्यामुळे वडिलांची काळजी वाटते का? असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “मुलगी म्हणून पप्पांची काळजी वाटते. ते माझे वडील आहेत. कोणत्या मुलीला वडिलांची काळजी नसते? माझा बाप मला परत हवाय, त्यामुळे आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्या”, अशी आर्त मागणी तिने सरकारकडे यावेळी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I want my father back we need maratha reservation jarange patils daughters plea to the government sgk

First published on: 13-09-2023 at 19:30 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×