नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गस्त घालत असताना विटा आणि तासगावमध्ये १५ लाखांची बेहिशोबी रोखड हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विटा व तासगाव येथे नगरपालिका निवडणूक सुरू असून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांची विटा शहरात नाकाबंदी सुरू असताना हुंडाई मोटार (क्र. एमएच १०-सीए ८८९९) या वाहनाची तपासणी संशयावरून करण्यात आली. मोटारीमध्ये सात लाख रुपयांची जुन्या ५०० रुपयांच्या चलनातील रोकड मिळाली. याप्रकरणी इरफान गफूर तांबोळी व ित्रबक तांदळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना खुलासा करता आला नाही. तसेच तासगावमध्येही नाकाबंदी सुरू असताना रात्री ९ च्या सुमारास कॉलेज कॉर्नर दत्त माळ येथे साताऱ्याहून आलेल्या मोटारीची (एमएच ११ वाय ३४५२) या वाहनाची झडती घेतली असता ८ लाख ३१ हजार रुपये मिळाले. या प्रकरणी मोटारीत असलेल्या अश्विन तानाजी कट्टे (रा. गोंदवले ता.माण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal cash grab in vita tasgaon
First published on: 14-11-2016 at 02:09 IST