लोकसत्ता वार्ताहर

जालना : अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या परतूर येथील तहसीलद‌ार प्रतिभा मोरे यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून वाहतुकीचे वाहन पळवून नेल्याचा प्रकार परतूर येथे घडला. याप्रकरणी परतूर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अकिल बिल्डर, इलियास कुरेशी, अजमत कुरेशी, इरफान युनूस शेख, जुनेद याच्यासह नावे माहीत नसलेल्या अन्य दोघांविरुद्ध तहसीलदार मोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ७ मार्च रोजी गौण खनिज उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी गस्तीवर असताना रात्री एकच्या सुमारास मोरे यांना परतूर येथील इंदिरानगरच्या पुढे जेसीबीद्वारे मुरूम उत्खनन करून हायवा वाहनात भरताना काही जण दिसले.

तहसीलदार त्या दिशेने गेल्या असता चालकाने जेसीबीसह पळ काढला. पाठलाग केला असता पारडगाव रस्त्यावर टायर खराब झाल्याने थांबलेला जेसीबी दिसला. जेसीबी ताब्यात घेऊन आणि छायाचित्रे काढताना सहा-सात जण आले. त्यांनी तहसीलदारांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार त्याचप्र‌माणे महाराष्ट्र राज्य महा ऋषीदार व नायब तहसीलदार संघटनेच्या विभागीय अध्यक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे.