सांगली : मठाची स्थापना करून त्यांच्या आड मद्य, गांजा सारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणारा अड्डा सावळज ता. तासगाव येथील महिलांनी बुधवारी सकाळी उध्वस्त करीत पोलीसांना कारवाईचे आव्हान दिले. माजी मुख्यमंत्री आर. आर. आबा पंाटील यांच्या अंजनी या मूळगावापासून अवघ्या पाच किलोमीटरवर हा प्रकार सुरू होता. सावळज ते अंजनी जाणार्‍या रोडवर काही दिवसापासून झोपडीवजा मठाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणाहून गांजा, दारू यांची विक्री होत होती. यामुळे गावातील तरूण व्यसनाच्या आहारी गेले होते. तरूणांच्या व्यसनाधिनतेचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसत होता. याबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, हा प्रकार थांबविण्यास प्रशासनाने चालढकल केली.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे – गौतमी पाटील

4 thousand power thefts in Nagpur circle know what is the status of Minister Devendra Fadnavis city
नागपूर परिमंडळात चार हजारावर वीजचोऱ्या; ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात काय आहे स्थिती माहितीये…?
Fraud by Ramdev Baba patanjali group by taking the land of farmers at cheap price
रामदेवबाबांकडून शेतकऱ्यांची जमीन स्वस्त दरात घेऊन फसवणूक! पतंजलीचे फूड, हर्बल पार्क कधी होणार?
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

बुधवारी सकाळी महिलांनी आक्रमक होउन या मठावर चाल करीत दारूचा साठा, रिकाम्या बाटल्या, गांजाच्या पुड्या आदी नशेखोर पदार्थाचा साठा नष्ट केला. मात्र, महिलांच्या रूद्रावतरामुळे अड्डा चालविणारा फरार झाला. नशेचा धंदा मांडणार्‍याला तात्काळ अटक करण्यासाठी महिलांनी मठासमोरच ठाण मांडले. हा प्रकार समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक महिलांना कठोर कारवाईचे आश्‍वासन देत यापुढे असा प्रकार घडू दिला जाणार नाही अशी हमी देत महिलांची समजूत काढली. मात्र, संबंधित व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी कायम असून याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.