सांगली : विवाहित पुरुषाचे परस्त्रीशी संबंध असल्याचा संशय होताच, पण पती महिलेच्या घरी आहे हे समजताच जाब विचारण्यासाठी गेलेल्या पत्नीला महिलेकडून मारहाण करण्याचा आणि त्यात कानच तुटण्याचा प्रकार सांगलीत घडला. एक माली दो फूलचा प्रकार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा – शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”

हेही वाचा – अभ्यासक्रम बदलाच्या अफवा पाठ्य पुस्तक विक्रेत्यांसाठी का ठरत आहेत संकट?

याबाबत मिळालेली माहिती अशी की पती-पत्नी बायपास रोड येथे एकत्र वास्तव्यास आहेत. मात्र, पती महिलेच्या घरी असल्याची माहिती मिळताच पत्नी पूजा बिरादार (वय ३७) ही जाब विचारण्यासाठी भावजयीला घेऊन महिलेच्या शामरावनगरमधील घरी गेली. यावेळी पती महिलेच्या मिठीत असल्याचे तिला आढळून आले. यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने याचा जाब विचारला. यातून दोन्ही महिलांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात संशयित महिला हसिना नदाफ यांनी पत्नीला हाताने मारहाण केली. जोराने केस ओढून कानातील सोनसाखळीला हिसडा दिला. यात कान फाटून जखमी झाली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात नदाफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.