वाई: साताऱ्यातील चाफळ (ता पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अनिकेत मोरे (२२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या घटनेनंतर  पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटीलही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खून झालेली युवती व संशयित अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत.

युवतीची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्याची काही दिवसांपूर्वी चाफळनजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेत व युवती एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे युवतीवर एकतर्फी प्रेमही होते. तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसांपूर्वी युवतीच्या आईची भेट घेवून लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत शेतात मजुरीवर कामे करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेत आजही चाफळला दुचाकीवरून आला होता. तो युवतीला भेटला. त्यांच्यात काही बोलणे होण्यापूर्वीचं त्याने तीचे तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. गावताली भर चौकात झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.