scorecardresearch

Premium

सुलेमानी खडा विक्रीच्या नावाखाली पुणेकरास पाच लाखांस गंडविले

सुलेमानी खडा दुर्मीळ असून तो अतिशय लाभदायक मानला जातो.

arrest
( प्रतिनिधिक छायाचित्र )

सोलापूर : दुर्मीळ आणि लाभदायक मानल्या जाणाऱ्या सुलेमानी खडा विकण्याच्या नावाखाली व्यवहार ठरविताना ऐनवेळी पोलीस छापा पडल्याचे दाखवत पुण्यातील एका व्यक्तीकडून पाच लाख रूपयांची रोकड हिसकावून घेणाऱ्या तिघाजणांच्या टोळीला सोलापुरात पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. या टोळीकडून लुटलेली पाच लाखांची रक्कमही हस्तगत करण्यात आली.

जफर ऊर्फ सिराज मोहम्मद हाशम शेख (वय ५७, रा. केशवनगर, दक्षिण सदर बझार, सोलापूर), इम्रान इलाहीखान पठाण (वय ३७, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) आणि सलमान जैनोद्दीन नदाफ (वय २६, रा. सिध्देश्वर नगर, मजरेवाडी, सोलापूर) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सूर्यकांत बबन आढाळगे (वय ४२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, सातववाडी हडपसर, पुणे) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

maharashtra, second place, country, flood, heavy rains, floods, lightning strike
अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद
Supriya Sule criticizes BJP
सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”
Twelve Jyotirlinga Miraj
सांगली : मिरजेत युवा अभियंत्याने साकारले बारा ज्योतिर्लिंग, पाहा व्हिडीओ
tur dal price, tur dal price increased, tur dal demand, demand for turdal in international markets, why tur dal price incresed
विश्लेषण : तुरीने विक्रमी दर गाठण्यामागचे कारण काय?

सोलापुरात एक व्यक्ती सुलेमानी खड्याची विक्री करते. सुलेमानी खडा दुर्मीळ असून तो अतिशय लाभदायक मानला जातो. हा खडा वापरल्यास कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. आयुष्यात भभराटच होते, अशी माहिती सूर्यकांत आढाळगे यांना एका मित्राकडून समजली. सुलेमानी खड्याची किंमत पाच लाख रूपये असून हा खडा विकत घेण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याला समक्ष भेटून व्यवहाराची खात्री देण्यासाठी ठरलेली पाच लाखांची रक्कम प्रत्यक्ष दाखवावी लागते, अशीही माहिती आढाळगे यांना समजली. त्यानुसार त्यांना सुलेमानी खडा विकत घेण्याचा मोह झाला. सुलेमानी खडा खरेदीसाठी केरळ आणि कोल्हापूरहूनही काही लोक येणार आहेत, असे आढाळगे यांना सांगितले गेले.

सुलेमानी खडा खरेदी विक्रीसाठी व्यवहार करण्यासाठी सोलापुरात हॉटेल लोटसमध्ये एकत्र येण्याचे ठरले. आढाळगे यांनी या व्यवहारासाठी हॉटेलमध्ये स्वतः खोली घेतली. ठरल्याप्रमाणे जफरभाई नावाची व्यक्ती व इतर चारजण हाॕटेलमध्ये खोलीत होते. सुलेमानी खडा खरेदीसाठी आणलेली पाच लाखांची रक्कम आढाळगे यांनी दाखवून जफरभाई यास खात्री पटवून दिली. परंतु त्याचवेळी त्यांच्या खोलीत दोघेजण आले आणि आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत सर्वांना धमकावले. आढाळगे यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांना खीलीतून बाहेर पडण्यास मज्जाव केला. नंतर त्या दोघा तोतया पोलिसांसह जफारभाई यांनी आढाळगे यांच्या हातातील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेऊन त्यांना पळवून लावले.

ही फसवणूक लक्षात आल्यानंतर आढाळगे यांनी पोलिसांत धाव घेतली. सदर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन माळी आदींनी या गुन्ह्याची उकल होण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि अवघ्या दोन तासांत संबंधित टोळीला पकडले. हवालदार औदुंबर आटोळे, इसाक नदाफ, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, सागर सरतापे, सैफन सय्यद, राम भिंगारे, विठ्ठल काळजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In the name of selling sulemani stone punekar fraud five lakh amy

First published on: 02-07-2022 at 20:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×