देशाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असल्याची माहिती आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. २०१४ च्या तुलनेत हे कर्ज दुप्पट असल्याने सरकारने दिलेल्या अच्छे दिनचं वचन पूर्ण न केल्याने सरकारने माफी मागावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी X या समाजमाध्यमावरून ही पोस्ट केली आहे.

“सोंग कशाचंही आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते आरवल्याशिवाय राहत नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “भारताच्या आर्थिक स्थितीची हीच अवस्था आहे. सन २०१४ साली ५५ लाख कोटी रुपयांचं कर्ज भारताच्या डोक्यावर होतं, मात्र २०२३ संपता संपता हा आकडा दुपटीपेक्षा जास्त होऊन १७३ लाख कोटी इतका झाला. भाजपाने २०१४ साली देशावरील कर्ज हा निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. हे कर्ज सारून अच्छे दिन आणू हा वायदा त्यांनी केला होता. आता भाजपाने या १७३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाबाबत खुलासा करावा. यासोबतच देशाला दिलेले वचन पूर्ण करू शकलो नसल्याची कबुली देऊन माफी मागावी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या टीकेनंतर आता काय प्रत्युत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.