सीताराम चांडे

राहाता : महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. राज्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. वारकरी संप्रदायात कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असून अभंग, ओव्या यांची सांगड घालून प्रबोधन करणाऱ्या कीर्तन कलेतून भक्तीच नाही तर समाजजागृती व प्रबोधन करण्याचे काम आजवर होत आहे. आता चक्क इंग्लिशमधून कीर्तनाची शाळा तालुक्यातील बाभळेश्वर येथे सुरू झाल्याने हरिभक्ताच्या कथा, संतांची शिकवण या कीर्तनाच्या माध्यमातून विदेशात जाणार आहे.

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!

बदलत्या काळानुसार वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनासाठी आधुनिक मार्ग स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. बाभळेश्वर येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलाची स्थापना २०१५ साली करण्यात आली आहे. या गुरुकुलाचे संस्थापक ह भ प नवनाथ महाराज म्हस्के यांनी स्वतची २१ गुंठे जमीन या गुरुकुलाला दान दिली. या जागेत भव्य गुरुकुलाची इमारत उभी आहे. गुरुकुलात २०० विद्यार्थी इयत्ता ३ री ते १२ पर्यंत वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेत आहेत. या मध्ये ४० अनाथ व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांंना दत्तक घेण्यात आले आहे. वारकरी शिक्षणाबरोबरच योग, कराटे, पोहणे, लाठीकाठी या बरोबरच संगीतशास्राचे धडे विद्यार्थ्यांंना दिले जातात.

२१ विद्यार्थ्यांंनी एकाच वेळी एकाच तालासुरात मृदुंग  वाजविण्याचा विक्रम केला आहे तर २० तरुणांनी थेट इंग्लिशमधून कीर्तन करायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे इंग्लिशमधून कीर्तन शिकविणारी हे राज्यातील पहिलेच गुरूकुल आहे. सर्वच जण कीर्तन, भजन, प्रवचन ऐकतात मात्र इंग्लिशमधून कीर्तन होते, ही बाब सर्वांना भुवया उंचविणारी आहे. या गुरुकुलातील विद्यार्थी इंग्लिशमधून कीर्तन करीत असल्याने वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनाची चळवळ आता केवळ महाराष्ट्रात आणि देशातच नाही तर साता समुद्रापलिकडे पसरणार आहे.

‘गुरुकुलात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असतानाच सुरुवातीला मराठीत कीर्तन करणाऱ्या या विद्यार्थ्यांंना नंतर इंग्लिशमधून कीर्तन करण्याचे शिक्षण मिळत आहे. यातील २० विद्यार्थी अस्खलित इंग्लिशमधून कीर्तनाचे प्रशिक्षण घेत आहेत. संत नामदेव महाराजांनी जशी वारकरी संप्रदायाची महती पंजाबपर्यंत पोहोचविली. ती आम्हाला आता जगभर पोहचवायची असल्याचे हे विद्यार्थी सांगतात. इंग्लिशमधून कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक साहित्य आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करू शकणार आहे. केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहाता वारकरी संप्रदायाची महती जगभरात जावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांंना इंग्लिश भाषेतून कीर्तन करण्याचे शिक्षण देत आहोत,’

– ह भ प नवनाथ महाराज म्हस्के, सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलाचे संस्थापक

‘आजचा काळ हा विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा असून आम्हाला वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या पर्यंत पोहोचवायचे झाल्यास अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालावी लागणार असून ग्लोबल वॉर्मिग, दहशतवाद यासह सर्वच विषयावर ही मुले कीर्तन करीत असून राज्य, देश-विदेशातील इंग्लिश शाळांमधील विद्यार्थ्यांंसमोर इंग्लिशमधून वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगण्याची गुरुकुलाची भविष्यातील योजना  आहे. ’

– भगवान महाराज डमाळे, अध्यक्ष गुरुकुल